maaoza mahadova

Subtitle

अखिल महाराष्ट्र  व  छत्रपती  शिवाजी महाराज  भोसले यांचे कुलदैवत 

Milford Sound in New Zealandॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ॐ पिनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ नीललोहिताय नमः ॐ शङ्कराय नमः ॐ शूलपाणये नमः ॐ खट्वाङ्गिने नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शिपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ श्रीकण्ठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ॐ भवाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ त्रिलोकेशाय नमः ॐ शितिकण्ठाय नमः ॐ शिवाप्रियाय नमः ॐ उग्राय नमः ॐ कपालिने नमः ॐ कौमारये नमः ॐ अन्धकासुर सूदनाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ॐ ललाटाक्षाय नमः ॐ कालकालाय नमः ॐ कृपानिधये नमः ॐ भीमाय नमः ॐ परशुहस्ताय नमः ॐ मृगपाणये नमः ॐ जटाधराय नमः ॐ क्तेलासवासिने नमः ॐ कवचिने नमः ॐ कठोराय नमः ॐ त्रिपुरान्तकाय नमः ॐ वृषाङ्काय नमः ॐ वृषभारूढाय नमः ॐ भस्मोद्धूलित विग्रहाय नमः ॐ सामप्रियाय नमः ॐ स्वरमयाय नमः ॐ त्रयीमूर्तये नमः ॐ अनीश्वराय नमः ॐ सर्वज्ञाय नमः ॐ परमात्मने नमः ॐ सोमसूर्याग्नि लोचनाय नमः ॐ हविषे नमः ॐ यज्ञमयाय नमः ॐ सोमाय नमः ॐ पञ्चवक्त्राय नमः ॐ सदाशिवाय नमः ॐ विश्वेश्वराय नमः ॐ वीरभद्राय नमः ॐ गणनाथाय नमः ॐ प्रजापतये नमः ॐ हिरण्यरेतसे नमः ॐ दुर्धर्षाय नमः ॐ गिरीशाय नमः ॐ गिरिशाय नमः ॐ अनघाय नमः ॐ भुजङ्ग भूषणाय नमः ॐ भर्गाय नमः ॐ गिरिधन्वने नमः ॐ गिरिप्रियाय नमः ॐ कृत्तिवाससे नमः ॐ पुरारातये नमः ॐ भगवते नमः ॐ प्रमधाधिपाय नमः ॐ मृत्युञ्जयाय नमः ॐ सूक्ष्मतनवे नमः ॐ जगद्व्यापिने नमः ॐ जगद्गुरवे नमः ॐ व्योमकेशाय नमः ॐ महासेन जनकाय नमः ॐ चारुविक्रमाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ भूतपतये नमः ॐ स्थाणवे नमः ॐ अहिर्भुथ्न्याय नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ अष्टमूर्तये नमः ॐ अनेकात्मने नमः ॐ स्वात्त्विकाय नमः ॐ शुद्धविग्रहाय नमः ॐ शाश्वताय नमः ॐ खण्डपरशवे नमः ॐ अजाय नमः ॐ पाशविमोचकाय नमः ॐ मृडाय नमः ॐ पशुपतये नमः ॐ देवाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ अव्ययाय नमः ॐ हरये नमः ॐ पूषदन्तभिदे नमः ॐ अव्यग्राय नमः ॐ दक्षाध्वरहराय नमः ॐ हराय नमः ॐ भगनेत्रभिदे नमः ॐ अव्यक्ताय नमः ॐ सहस्राक्षाय नमः ॐ सहस्रपादे नमः ॐ अपपर्गप्रदाय नमः ॐ अनन्ताय नमः ॐ तारकाय नमः ॐ परमेश्वराय नमः

या वेळेस शंभु महादेव  आणि पार्वतीचा विवाह सोहळ्याचा मुहूर्त केला जातो .मुहूर्त  म्हणजे (हळकुंड  ) हळद जात्यावर दळली जाते .शिखर शिंगणापूरची यात्रा  चैत्र गुढीपा़डव्यापासुन ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते   

या वेळेस संध्याकाळी शंभु महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच  शिवलिंगाला  हळद  लावली जाते .या  सोहळ्याला  महादेवाला आणि पार्वतीमातेला हळद लावण्यासाठी खानदेशातील आणि  पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वर्‍हाडी म्हणून येतात 


या दिवशी संध्याकाळी शंभु महादेव मंदिराचे  शिखर(कळस)  बांधून ते श्री अमृतेश्वर (बळी ) मंदिराचे  शिखर(कळस ) यांना पागोटे  (सुताची जाड दोरी) बांधले जाते .यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात .यांस शंभु महादेवाचा  आहेर मानला जातो .आणि रात्री  १२ वाजता मंगलाष्टके  व  सनई चौघड्याच्या  गजरात शंभु महादेव  आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा "हर हर हर महादेव"  च्या  जयघोषात पार पाडला जातो .


या दिवशी  संध्याकाळी ५ वाजता  घोड्यावर बसून इंदूरचा राजा होळकरांचा महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा मान असतो  .त्यास  शंभु महादेवाचा वरदावा  म्हणतात . तो एकादशी दिवशी  फक्त कांदा भाकरी  खावून  येतो .क्षोरकुर्म  करून येतो .

या दिवशी अनेक पवित्र  नद्यांचे पाणी कावडीतून आणून शंभु महादेवाचा  अभिषेक केला जातो .याला कावडी सोहळा म्हणतात .या सर्व कावडी रणरणत्या  उन्हात कठीण अशा मुंगी घाटातून शंभु महादेवाच्या मंदिरात येउन  पोहचतात .या कावडी सोहळ्यात  प्रथम मानाची  कावड  श्री संतयोगी भुतोजी तेली यांची कावड होय .पूर्वी भुतोजी तेली कावड खांद्यावर  घेण्यापूर्वी आपल्या घरादाराला  पेटवून  येत असे  . आणि शंभु महादेवाची  यात्रा पूर्ण करून घरी जात असे ,त्या वेळेस पेटवलेले घर  जशेच्या  तसे असते .याला शंभु महादेवाची कृपा म्हटली जाते

महाशिवरात्री  उत्सव  हा हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा उत्सव मानला जातो .शिवरात्रीच्या शुभ दिवशी भक्ताने  भोळ्या महादेवाची अभिषेक व पूजा केल्यामुळे त्याला त्याच्या मागील जन्मातील पाप दोष मुक्ती  आणि मोक्ष प्राप्ती होते 

दुध ,दही ,मध ,तूप, साखर ,पाणी  ही द्रव्यांचा शिवलिंगावर अभिषेक केला जातो 

या द्रव्यांचे महत्व शिवपुराणात  सांगितले आहे 

दुध -पवित्रता 

दही - समृद्धी आणि संतान सुख  मिळते 

मध - मधुर स्वरासाठी 

तूप -विजय मिळवण्यासाठी 

पाणी - निर्मलपणासाठी .

या व्यतिरिक्त बेल ,दवणा ,धोत्रा,फुल ,वाहिले जातात 

म्हणून शिखर शिंगणापूर येथे  महाशिवरात्र सोहळा पाच दिवस  मोठ्या उत्साहात पार पाडला जातो . 

.

सर्वाधिकार सुरक्षित : श्री शंभु देवस्थान (मोठा महादेव) -श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर  -२०१६